देशभरात सध्या आगी लागण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे. योग्य खबरदारी न घेतल्याने काही ठिकाणी भीषण आग लागल्याचे आपण पहिले आहे. तामिळनाडूतील एका फटाक्यांच्या कारखान्यात देखील भीषण आग लागली आहे. तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीजवळील सेंगमलापट्टी येथील फटाक्यांच्या कारखान्यात गुरुवारी स्फोट झाला. या अपघातात आतापर्यंत ५ महिलांसह ८ कामगारांना जीव आपला गमवावा लागला आहे. या स्फोटात १० जण जखमी झाले असून, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
https://twitter.com/ANI/status/1788540918028538237
या स्फोटात ८ कामगारांचा मृत्यू झाला असून १० कामगार जखमी झाले आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना शिवकाशी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की कारखान्यातील ७ खोल्या उद्ध्वस्त झाल्या. शिवकाशी पूर्व पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघाताच्या कारणाचा शोध सुरू आहे. पीडितांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले की, निवडणूक आयोगाची परवानगी घेतल्यानंतर सरकार आवश्यक ती आर्थिक मदत करेल.