अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः।
ईदं ब्राह्मम् इदं क्षात्रं शापादपि शरादपि
ह्या श्लोकाचा अर्थ
चारही वेद मुख़ोद्गत आहेत, पाठिवर बाणासह धनुष्य आहे
म्हणजेच ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज दोनही जाणतो व शाप व शस्त्र दोनही गोष्टींचा उपयोग जाणतो तो *परशुराम*
भगवान विष्णूंचा सहावा अवतार
प्रसनजित राजाची कन्या रेणूका व जमदग्नी ॠषी यांचा पाचवा पूत्र *राम* हाच पूढे *परशुराम*
म्हणून ओळख़ला गेला. कुशाग्र बुध्दीचा हा बालक. वयाच्या आठव्या वर्षा पर्यंत सर्व विद्या आत्मसात केल्या होत्या.
परशुरामाच्या शौर्य कथा जाणल्यास परशुरामाच्या अद्वितिय बुध्दिमता व साहस व शौर्याची कल्पना येते.
भगवान शंकराची तपश्चर्या करून शंकरांकडून त्यांनी परशु हे अस्त्र मिळवले होते म्हणून त्यांचे नाव परशुराम असे पडले
एकदा जमदग्नी ॠषी आपली पत्नी रेणूका हिच्यावर तिच्या चुकीमुळे क्रोधीत झाले.अत्यंत कोपिष्ट जमदग्नी. त्यांनी आपल्याच मुलांना आपली पत्नी रेणूका हिचा वध करण्याची आद्य्ना दिली. कोणीच पूढे येईना परशुराम पुढे आले त्यांनी आपल्या आईचा व तीला वाचवण्या साठी पुढे आलेल्या आपल्या भावंडांचाही वध केला.
जमदग्नी ॠषी ख़ुष झाले. त्यांनी परशुरामाला वर माग म्हणून सांगीतले. परशुरामांनी पित्याकडे आपली आई आणि भावंड यांचे आयुष्य परत मागीतले.
वडिलांची आज्ञा पाळली व आईचे आयुष्य परत मिळवले.
सध्याचा कोकणापासुन ते केरळ पर्यंत चा भुप्रदेश हा परशुरामांनी ४०० योजने समुद्र मागे हटवुन तयार केलेला भुप्रदेश आहे अस समजतात. चिपळूण जवळच्या महेंद्रगीरी पर्वतावर आजही परशुरामांचा वास आहे अस मानतात. परशुराम चिरंजीवी आहेत.
सहस्त्रार्जुन ह्याने भगवान शंकरांची घोर तपश्चर्या करून त्यांच्याकडून सहस्त्र हात मिळवले होत. सहस्त्रार्जुनाला या सगळ्याचा अहंकार झाला होता. त्यांनी त्या अहंकाराच्या जोरावर जमदग्नी ऋषींच्या आश्रमातली कपिला गाय जबरदस्तीने पळून नेली होती. परशुरामाने क्रोधित होऊन त्याच्या सगळ्या भुजा कापून टाकल्या होत्या. त्याचा बदला घेण्यासाठी सहस्रार्जुनाने आणि त्याच्या मुलांनी तपश्चर्याला बसलेल्या जमदग्नी ऋषींचा वध केला. त्याने तर परशुराम खूप क्रोधित झाले आणि क्षत्रिय वंशाच्या या सहस्त्रार्जुनाचा पूर्ण क्षत्रिय वंश 21 वेळा पृथ्वीवरून नष्ट केला परशुरामांनी हैहय वंशक क्षत्रियांच्या रक्ताने पाच सरोवर भरली. आपल्या पित्याचे श्राद्ध सहस्त्रार्जुन आणि त्याच्या पुत्रांच्या रक्तांनी केलं. क्षत्रिय राजासारखा अश्वमेध यज्ञ केला आणि पृथ्वीवर संपूर्ण राज्य संपादन केले होते. हे राज्य त्यांनी महर्षी कश्यप यांना दान करून आपण स्वतः महेंद्रगिरी पर्वतावरती राहू लागले.
पुढे रामायणात व महाभारतात ही परशुरामांचा उल्लेख आढळतो सीता स्वयंवराच्या वेळेला पहिल्यांदा शिव धनुष्याला प्रत्यंच्या लावण्यासाठी परशुराम पुढे आले होते. तेव्हा प्रभू रामचंद्रांनी परशुरामाचं पूजन केलं आणि परशुरामांनी त्यांना आशिर्वाद दिले. महाभारतात सुद्धा कर्णान परशुरामांकडूनच विद्या संपादन केले होती.
गणपतीला एकदंत असंही म्हटलं जातं. गणपती एकदंत असल्याचं कारण सुद्धा परशुरामच आहेत. गणपती आणि परशुराम यांच्या झालेल्या युद्धामध्ये परशुरामांनी गणपती वरती परशु चालवला आणि त्यामुळे गणपतीचा एक दातच तुटला अशी पण दंतकथा आहे.
परशुराम हे म्हणजे ब्रम्हतेजस्वी वेद,ॠचा यांचा अभ्यास असलेले ज्ञानी तितकच शौर्य असलेले पराक्रमी.आपण सर्व हिंदू संस्कृती आणि परंपरा जपणारे ह्या सगळ्याचा पुरुषार्थ जर आपल्याला टिकवायचा असेल तर आपल्याला परशुरामांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी हवेतच.
शुभांगी देवधर, नाशिक
सौजन्य -समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत