दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडी कोठडीत आहेत. २१ मार्च रोजी त्यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तसे आज अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सुप्रीम कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे अरविंद पुन्हा एकदा निवडणुकीच्या प्रचारात दिसण्याची शक्यता आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर करताना कोणत्या अटी-शर्ती घातल्या आहेत हे अजून स्पष्ट झालेले नाहीये. केजरीवाल यांनी जुलै महिन्यापर्यंत जामीन मिळावा अशी मागणी केली होती. मात्र कोर्टाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.