आज आयपीएलच्या स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स या दोन संघांमध्ये सामना होणार आहे. आजचा सामना गुजरात टायटसनसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. करो या मरो या स्थितीत आज गुजरातला खेळावे लागणार आहे. तर दुसरीकडे प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जला देखील विजयाची नितांत गरज आहे.
गुजरात टायटन्स संघाला मागील पाच सामन्यांपैकी चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये पोहचणे अवघड झाले आहे. त्यामुळे गुजरातला आजच्या सामन्यात कमालीची सुधारणा करावी लागणार आहे. तर चेन्नईचे काही प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त व काही ओरडलं कप स्पर्धेसाठी मायदेशी परतले असल्याने त्यांच्या गोलदांजीची धार थोडीशी कमी झालेली आहे.