देशातील वातावरण सतत बदललेले पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात काही ठिकाणी वरुणराजा कोसळत आहे. पुढील काही तासांमध्ये राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, छ. संभाजीनगर या जिल्ह्यात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान काल देखील नागपुरात मुसळधार पाऊस कोसळला. बंगलोरमध्ये देखील जोरात पाऊस कोसळला होता. राज्यातील वातावरण सतत बदलताना दिसत आहे. हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदजानुसार १२ ते १५ जून दरम्यान राज्यात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावल्याचे दिसून येत आहे. हा मान्सूनपूर्व पाऊस असण्याची शक्यता आहे. काल सकाळी राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तासाभरात एकूण ४७ मिलीमीटर पाऊस नागपूर शहरात झाला आहे.