KL Rahul : लखनौ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार म्हणून केएल राहुलच्या भवितव्याबाबत वादविवाद तीव्र झाले असून, बुधवारी झालेल्या दणदणीत पराभवानंतर सनरायझर्स हैदराबाद आयपीएलच्या प्ले-ऑफ शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. लखनौच्या पराभवानंतर लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका केएल राहुलवर जोरदार टीका करताना दिसले. तर आता यानंतर लखनौ सुपर जायंट्समध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत.
उरलेल्या दोन सामन्यांमध्ये कर्णधार केएल राहुल स्वतःच आपले पद सोडून फलंदाजीवर लक्ष केंद्रित करेल, अशी चर्चा सुरू होती. पण, आता फक्त दोन सामने शिल्लक असताना, राहुल संघाचे नेतृत्व करत राहण्याची अपेक्षा आहे. एका आयपीएल सूत्राने पीटीआयला सांगितले, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पुढील सामन्यापूर्वी पाच दिवसांचा ब्रेक आहे. त्यामुळे अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून उर्वरित दोन सामन्यांमध्ये राहुलने केवळ फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला तर व्यवस्थापनाला कोणतीही अडचण येणार नसल्याचे समजते.
जर कर्णधार केएल राहुलने पुढच्या दोन सामन्यांमध्ये संघाची कमान सोडण्याचा निर्णय घेतल्यास संघाचे कर्णधारपद दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवू शकते. कर्णधारपदाच्या दावेदारांच्या यादीत सध्या निकोलस पूरनचे नाव आघाडीवर आहे. पुरणकडे कर्णधारपदाचा चांगला अनुभव असून तो संघाचा उपकर्णधारही आहे.
दरम्यान, लखनौ संघाचा अपेक्षा अजूनही संपलेल्या नाहीत कारण संघ 14 मे रोजी नवी दिल्ली येथे दिल्ली कॅपिटल्स आणि 17 मे रोजी वानखेडे येथे मुंबई इंडियन्स विरुद्धचे उर्वरित दोन सामने जिंकून 16 गुणांपर्यंत पोहोचू शकतो.