लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दरम्यान भारतीय निवडणूक आयोगाने काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना फटकारले आहे. मतदारांच्या मतदानाच्या आकडेवारीवर बिनबुडाचे आरोप करत असल्याने खर्गे यांना निवडणूक आयोगाने फटकारले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. अजून चार टप्प्यातील मतदान बाकी आहे. त्यामुळे खर्गे यांच्या आरोपांना निवडणूक आयोगाने गंभीर दाखल घेत त्यांना फटकारले आहे.
निवडणूक आयोगाने सांगितले, काँग्रेस अध्यक्षांनी चालू असलेल्या निवडणुकीमध्ये मतदारांच्या मतदानाची आकडेवारीबद्दल काही चुकीचे आरोप लावले आहेत. जे संभ्रम, चुकीचे दिशानिर्देश आणि मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या संचालनात अडथळे निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. आयोगाने पुढे म्हटले आहे की अशा वक्तव्यांमुळे मतदारांच्या सहभागावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि राज्यांमधील मोठ्या निवडणूक यंत्रणेचे मनोधैर्य खचू शकते.