देशात सात टप्प्यांत होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. सायंकाळी सहा वाजता प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या दिसून येतील. या टप्प्यात 13 मे रोजी 10 राज्यांमधील लोकसभेच्या 96 जागांवर मतदान होणार आहे.
सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले आहे. तिसऱ्या टप्प्यात 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांवर सरासरी 64 टक्के मतदान झालेले बघायला मिळाले. चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मतदान होणार आहे. एकूण 1717 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी लोकसभेच्या 49 जागांवर, सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी 57 जागांवर आणि सातव्या टप्प्यात 01 जून रोजी लोकसभेच्या 57 जागांवर मतदान होणार आहे. 04 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.