लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान देशभरात प्रचाराला जोर आला आहे. भाजपच्या अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा असुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाणा साधला आहे. मी हैद्राबादला येईन तेव्हा मला अडवून दाखवा असे आव्हान राणा यांनी ओवैसी यांना एका प्रचारसभेतून दिले आहे. राणा पुढे म्हणाल्या आज देशभरात सर्वत्र रामभक्त फिरत आहेत. ओवैसी यांच्या त्या विधानानंतर नवनीत राणा यांचे हे वक्तव्य आले आहे.
काही वर्षांपूर्वी एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवेसी यांनी १५ मिनिटे पोलीस हटविले तर तुम्हाला दाखवून देऊ असे विधान केले होते. आता या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी पलटवार केला होता. भाजप नेत्या नवनीत राणा यांनी हैदराबादमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना अकबरुद्दीन ओवेसी यांच्या १५ मिनिटांच्या वक्तव्यावर १५ सेकंदाचे वक्तव्य केले आहे. नवनीत राणा म्हणाल्या, “छोटा म्हणतो, १५ मिनिटांसाठी पोलिसांना हटवा मग आम्ही काय करू शकतो ते दाखवू. मी छोट्याला सांगते , तुला १५ मिनिटे लागतील. आम्हाला फक्त १५ सेकंद लागतील. जर तुम्ही १५ सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर, मग छोटा- मोठा कुठून आला आणि कुठे गेला हे कळणारच नाही.