लोकसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीची जी सांगता सभा होणार आहे त्या सभेला अरविंद केजरीवाल हे उपस्थित राहतील आणि ते काय सांगतात हे सर्व ऐकतील असे सांगून उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुढे सांगितले की नाशिक मध्ये शिवसेना उमेदवार राजाभाऊ वाजे हेच प्रथम क्रमांकावर निवडून येतील. कारण नाशिकने आजपर्यंत कधीही गद्दारांना स्थान दिलेले नाही आणि यापुढे देणार पण नाही.
उबाठा शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे नाशिक मध्ये शनिवारी प्रचारासाठी सभा घेणार आहेत. त्यासाठी म्हणून नाशिक दौऱ्यावरती आले होते. त्यावेळी त्यांचे स्वागत जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे महाविकास आघाडीचे समन्वयक डीजी सूर्यवंशी नाशिक रोड व्यापारी बँकेचेजेष्ठ संचालक आणि ज्येष्ठ शिवसैनिक दत्ता गायकवाड, वसंत गीते, विनायक पांडे यांच्यासह शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची झालेली सुटका हे स्वागत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल रात्री त्यांच्याशी फोन द्वारे चर्चा केली असून त्यांचे अभिनंदन करत त्यांना 17 तारखेला महाविकास आघाडीची प्रचार सांगता सभाजी होणार आहे या सभेचे निमंत्रण देखील दिले असून त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील मुंबई दौऱ्यावरती आहेत. त्यावेळी केजरीवाल हे काय घडले आहे हे सांगतील असेही त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवरती नाराजी व्यक्त केली. आज ज्या परिवाराने महाराष्ट्र एकसंघ ठेवण्यासाठी म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे , हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या दिशेने आणि आंदोलन खस्ता खाऊन मराठी भाषिकांचा प्रश्न मार्गी लावला त्यांच्या पाठीमागे उभे राहिले आज त्याच परिवारातील एक घटक औरंगजेबासारखा काम करणाऱ्या आणि महाराष्ट्रा वरती सतत अन्याय करणाऱ्या व्यक्तींच्या पाठीमागे आणि त्यांच्या पक्षाला मदत करत असेल तर हे नक्कीच या दोघांच्याही आत्म्याला शांती न मिळणारे आहेत. त्यामुळे हा प्रकार चुकीचा असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
नाशिक लोकसभा प्रचार सभा घेण्यापूर्वी ते म्हणाले की, नाशिक लोकसभा मतदारसंघात आमच्या शिवसेनेचे उमेदवाराच विजयी होणार आहे यामध्ये कोणतीही शंका नाही. त्यांचा प्रचार हा खूप शिगेला पोहोचला आहे. त्या विषयावरती कोणी विचार करणे हे चुकीचे आहे. त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे. पण या मतदारसंघात दोन नंबरला शांतिगिरी महाराज असतील आणि तीन नंबरला ज्यांनी गद्दारी केली ते असतील. कारण नाशिकमध्ये कधीही गद्दारांना धारा दिला जात नाही आणि तो कधी मिळणार पण नाही. नाशिकची जनता तेवढी सुज्ञ आहे असे सांगून राऊत म्हणाले की विजय करंजकर यांच्या बाबतीमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका म्हणजेच आमचा निर्णय हा चुकीचा होता यावर शिक्का मोर्तब आहे करणारी ही आहे.