लोकसभा निवडणुक चालू असताना काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
१३ तारखेला लोकसभा निवडणुकीसाठी ४ थ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. याचवेळी
बिहार काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ प्रवक्ते विनोद शर्मा
यांनी पक्ष सोडला आहे. त्यांनी शनिवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना
यासंबंधीचे पत्रही पाठवले असून, त्यात त्यांनी पक्ष सोडण्याची अनेक
कारणे नमूद केली आहेत.
बिहार काँग्रेसचे प्रवक्ते विनोद शर्मा
यांनी खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ”मी काँग्रेस
पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि प्रवक्ता पदाचा आणि मीडिया भारत जोडो न्याय
यात्रेचा सहसंयोजक पदाचा राजीनामा देत आहे. कारणांचा उल्लेख करताना त्यांनी लिहिले
आहे की बिहारमध्ये जंगल राज पार्ट-2 च्या शुभारंभासाठी काँग्रेस पक्षाने
आरजेडीसमोर शरणागती पत्करली आणि ‘भारत तेरे सौ-सौ टुकडे होंगे‘चा
नारा देणाऱ्या व्यक्तीला लोकसभेचे उमेदवार बनवले.”