दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने १
जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे. दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी त्यांना जामीन
देण्यात आला आहे. काल केजरीवाल हे तुरुंगांतून बाहेर आले आहेत. त्यांनी बाहेर
येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
दरम्यान केजरीवाल यांनी भाजपा सत्तेत आल्यास मोदी हे पुढील वर्षांपर्यंतच
पंतप्रधान राहतील असे विधान केले होते. याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी
प्रत्युत्तर दिले आहे. ७५ वर्षानंतर कोणी पंतप्रधान होऊ शकत नाही असे भाजपाचे
संविधान सांगत नाही असे शाह म्हणाले आहेत.
वयाच्या ७५ व्या वर्षानंतर कोणीही नेता भाजपात राजकारणात सक्रिय राहू
शकत नाही असा नियम खुद्द मोदींनी केल्याचे केजरीवाल म्हणाले होते. भाजपा निवडणूक
जिंकल्यास मोदी पुढील वर्षापर्यंत पंतप्रधान राहतील. त्यानंतर भाजपा अमित शाह
यांना पंतप्रधान बनवेल असे ते म्हणाले. केजरीवाल यांना प्रत्युत्तर देताना अमित
शहा म्हणाले, अरविंद केजरीवाल ७५ वर्षांचे झाल्यावर पंतप्रधान पद सोडतील असे
सांगून मोठी चूक करत आहेत. गृहमंत्री म्हणाले, “मी अरविंद
केजरीवाल अँड कंपनी आणि इंडिया आघाडीला सांगू इच्छितो की भाजपच्या घटनेत (75
वर्षे जुना मर्यादा नियम) अशा कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नाही. पंतप्रधान मोदी
केवळ हा कार्यकाळ पूर्ण करणार नाहीत. पण भविष्यात पंतप्रधान मोदी देशाचे नेतृत्व
करत राहतील यात कोणतीही शंका नाही.
दरम्यान अरविंद केजरीवाल हे ईडी कोठडीत
होते. २१ मार्च रोजी त्यांना ईडीने अटक केली होती. मात्र निवडणुकीचा काळ असल्याने
त्यांना १ जूनपर्यंत काही अटी शर्तींसह
जामीन मंजूर करण्यात आला आहे. १ जून नंतर त्यांना पुन्हा एकदा सरेंडर करावे लागणार
आहे. दिल्लीतील दारू घोटाळ्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे.