CM Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इंडिया टीव्हीच्या लोकप्रिय शो ‘आप की अदालत’मध्ये काँग्रेस नेत्यांना आणि पाकिस्तानला खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले. रजत शर्मा यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, फक्त पाकिस्तानच काँग्रेस लोकांची वकिली करू शकतो.
योगी आदित्यनाथ म्हणाले, भारतात काँग्रेस पक्षाचं ऐकणारं कोणी नाही. पुढे मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आलं की, काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर म्हणतात की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. त्यावर योगींनी उत्तर दिले की, भारताचा अणुबॉम्ब काय फ्रीजरमध्ये ठेवण्यासाठी आहे का. आधी आम्ही कोणाला छेडणार नाही आणि नंतर आम्ही शत्रूला सोडणारही नाही.
पुढे पीएम मोदींचे कौतुक करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले, केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर देशाची अंतर्गत सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे. तसेच आता भारत स्वतः इतरांशी व्यवहार करतो. हा नवा भारत आहे. हा भारत कोणाला छेडत नाही पण कुणी छेडले तर त्याला सोडतही नाही. घरात घुसून उत्तर देईल. पाकिस्तान कटोरा घेऊन भिकाऱ्यासारखा जगभर फिरत आहे. पण त्यांना कोणी भिक्षाही देत नाही, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
सीएम योगींनी पाकिस्तानची वकिली करणाऱ्यांवरही जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “जावा ना मग पाकिस्तानकडे जाऊन भीक मागा, का भारतावर ओझे बनून राहत आहात”, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.