Mothers Day : आज मदर्स डे आहे, त्यामुळे संपूर्ण देशभरात मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या खास दिवशी प्रत्येकजण आपल्या आईसोबतचे खास क्षण, फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आहे.
मदर्स डे निमित्त आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदींचे आणि त्यांच्या आईचे खास क्षण दाखवण्यात आले आहेत.
भाजप पक्षाच्या अधिकृत पेजवर पंतप्रधान मोदी आणि त्यांची आई हिराबेन मोदी यांचा एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या आईचे बॉन्डिंग दिसत आहे. तसेच या व्हिडीओत दोघांसोबत घालवलेले सुंदर क्षण दाखवले आहेत.
https://twitter.com/BJP4India/status/1789502421305045124
पंतप्रधान मोदींचा त्यांच्या आईसोबतचा हा खास व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडीओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.