आज देशभरात ९६ जागांसाठी म्हणजेच चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे.
सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. देशात ९६ तर महाराष्ट्रात ११
जागांवर मतदान होत आहे. राज्यातील नंदुरबार, जळगाव, बीड,
अहमदनगर,
पुणे,
शिरूर,
छत्रपती
संभाजीनगर, रावेर, शिर्डी, मावळ, जालना या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरु झाले आहे.
दरम्यान या ११ जागांमध्ये शिरूर, अहमदनगर ,
छत्रपती
संभाजीनगर आणि पुणे या जागांवर अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. अनेक राजकीय
मंडळींनी आपला मतदानाचा हक्क बजावा आहे. जळगावमध्ये भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ
यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजवाला आहे. अहमगनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार
निलेश लंके यांनी देखील मतदान केले आहे. महायुतीच्या नेतृत्वात आम्ही राज्यात ४५
जागा जिंकू असा विश्वास केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान महाराष्ट्रात महाविकास आघाडी
विरुद्ध महायुती असा सामना रंगणार आहे. दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात प्रचार
करण्यात आला आहे. तसेच एकमेकांवर आरोपांच्या फैरी देखील झाडल्या गेल्या आहेत. तसेच
मुद्द्यांवर प्रचार करण्यात आला आहे. त्यामुळे जनता कोणाला साथ देणारे हे आता ४
जूनलाच स्पष्ट होणार आहे.