यंदा हैद्राबादमध्ये लोकसभेसाठी हायव्होल्टेज लढत बघयला मिळणार आहे. हैद्राबादमध्ये ओवैसी बंधूंच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी भाजपाने लता माधवी यांना लोकसभेचे तिकीट दिले आहे. दोन्ही बाजूनी जोरदार प्रचार करण्यात आला आहे. तरं आज चौथ्या टप्प्यात हैद्राबादमध्ये देखील मतदान होत आहे. दरम्यान या दोन्ही उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवैसी आणि भाजपच्या हैद्राबादच्या लोकसभेच्या उमेदवार लता माधवी यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे. तसेच लता माधवी यांनी सर्वाना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
https://twitter.com/NewsMobileHindi/status/1789846500144492662?t=t7MzCR7DITLDHxL2PwzxmQ&s=08
देशभरात आज लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. देशामध्ये आज ९६ जागांसाठी मतदान होत आहे. सर्व पक्षासह निवडणूक आयोगाने देखील सर्वाना आपला मतदानाचा अधिकार बजावावा असे आवाहन केले आहे. ९६ जागांमध्ये अनेक केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री आणि मोठे नेत्यांचे भवित्यव्य मतपेटित आज बंद होणार आहे.
https://twitter.com/Kompella_MLatha/status/1789846144048128279?t=xXR1m1VWG0jOINMiRN30Ug&s=08
लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेशमध्ये २५, उत्तर प्रदेशमध्ये १३, तेलंगणा १७ , महाराष्ट्रामध्ये ११ मध्य प्रदेशमध्ये ८, बिहारमध्ये ५, पश्चिम बंगालमध्ये ८ आणि झारखंडमध्ये ४ तर जम्मू काश्मीरमधील १ व ओडिशामधील ४ जागांवर मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यात आंध्र प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मतदान होत आहे. एकूण १७१७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आतापर्यंत तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर निवडणुकीचा निकाल हा ४ जून रोजी जाहीर होणार आहे.