Loksabha 4th Phase Voter Count : आज (13 मे) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशभरात 96 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. देशात 96 तर महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होत आहे.
आता चौथ्या टप्प्यातील सकाळी 9 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. देशात एकूण 10.35 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वात कमी मतदान जम्मू-काश्मीरमध्ये झाले आहे.
बिहार – 10.18 टक्के
महाराष्ट्र – 6. 45 टक्के
जम्मू-काश्मीर – 5.07 टक्के
आंध्र प्रदेश – 9.05 टक्के
झारखंड – 11.78 टक्के
मध्य प्रदेश – 14.97 टक्के
ओडिशा – 9.23 टक्के
उत्तर प्रदेश – 11.67 टक्के
तेलंगणा – 9.51 टक्के
पश्चिम बंगाल – 15.24 टक्के
दरम्यान, राज्यातील नंदुरबार, जळगाव, बीड, अहमदनगर, पुणे, शिरूर, छत्रपती संभाजीनगर, रावेर, शिर्डी, मावळ, जालना या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरु झाले आहे. त्यामुळे आज अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर आज सकाळपासून लोकांच्या मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. यामध्ये सामान्य जनतेसह अनेक कलाकार, राजकीय नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.