Pune Loksabha Election 2024 : आज चौथ्या टप्प्यासाठी पुण्यात मतदान सुरू असतानाच भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील फडके हौद चौक परिसरात भाजपने आंदोलन केलं आहे. कारण बुथ परिसरामध्ये काँग्रेसचे बॅनर असल्यामुळे भाजपचे हेमंत रासने आक्रमक झाले असून त्यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडे आंदोलन केले जात आहे.
भाजपच्या या आंदोलनाची दखल घेत पोलिसांनी आणि अधिकाऱ्यांनी रवींद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच बुथ परिसरात लावलेले बॅनर देखील अधिकाऱ्यांनी हटवले आहे. अधिकाऱ्यांच्या या कारवाईनंतरही हेमंत रासने त्यांच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे.
रवींद्र धंगेकर यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी यावेळी हेमंत रासनेंनी केली आहे. त्यामुळे पुण्यात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
दरम्यान, आज (13 मे) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशभरात 96 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. देशात 96 तर महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होत आहे.