Pankaja Munde : आज देशात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. आज राज्यातील नंदुरबार, जळगाव, बीड, अहमदनगर, पुणे, शिरूर, छत्रपती संभाजीनगर, रावेर, शिर्डी, मावळ, जालना या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरु झाले आहे. त्यामुळे आज अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आज सकाळपासून लोकांच्या मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. यामध्ये सामान्य जनतेसह अनेक कलाकार, राजकीय नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये आता बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी आज सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केल्यानंतर पंकजा मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, “मला विश्वास आहे की आम्ही चारशे जागांचा टप्पा करू. ज्यावेळी पंतप्रधान मोदींनी 400 पारचा नारा दिला होता तेव्हापासून मला वाटतं की आम्ही तो पार करू शकू. “
“आज अतिशय महत्त्वाच दिवस आहे. त्यामुळे मला लोकांना आवाहन करायचं आहे की त्यांनी बाहेर पडून मतदान करावं. आज मला माझे वडील गोपीनाथ मुंडे यांनी खूप आठवण येत आहे. पण त्यांची उर्जी माझ्यासोबत आहे आणि ते मला आशीर्वाद देत आहेत. मराठा आरक्षण हा एक महत्त्वाचा मुद्दा होता पण जनतेला सर्व काही समजलं आहे, त्यामुळे ते शहाणपणाने मतदान करतील”, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.