लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यात 11 वाजेपर्यंत 17.51 टक्के मतदान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्याजवळच्या रावेर शहरात पावसामुळे धावपळ झाल्याचे पाहायला मिळाले.शहरातील मतदान केंद्रावर सकाळी साडेआठच्या सुमाराला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला होता. . ढगांच्या गडगडाटासह पंधरा-वीस मिनिटे पाऊस सुरू होता. पावसामुळे घराघरातून उन्हापूर्वी मतदानासाठी निघालेले मतदार थांबले होते.
इतकेच नव्हे तर मतदान केंद्रातून मतदान झालेल्या मतदारांनाही मतदान केंद्रातच थांबून राहावे लागले. या अचानक आलेल्या पावसामुळे नंतर मतदानाचा वेग काहीसा मंदावला आहे.मात्र बाकी ठिकाणी मतदानासाठी उत्साह दिसून येत आहे.
चौथ्या टप्प्यातील राज्यातली एकूण 11 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
नंदुरबार – २२.१२ टक्के
जळगाव- १६.८९ टक्के
रावेर – १९.०३ टक्के
जालना – २१.३५ टक्के
औरंगाबाद – १९.५३ टक्के
मावळ -१४.८७ टक्के
पुणे – १६.१६ टक्के
शिरूर- १४.५१ टक्के
अहमदनगर- १४.७४ टक्के
शिर्डी -१८.९१ टक्के
बीड – १६.६२ टक्के