केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) आज बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहेत.87.98% विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णतेची टक्केवारी 0.65% ने वाढली आहे.
18417 शाळांनी 7126 केंद्रांवर सीबीएसई बारावीची परीक्षा दिली होती. या वर्षी एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 87.98 आहे जी 2023 पासून 0.65 टक्क्यांनी वाढली आहे. त्रिवेंद्रम प्रदेशाने सर्वाधिक 99.91 टक्के उत्तीर्णतेची नोंद केली आहे.
एकूण दिल्ली विभागात ९४.९ टक्के उत्तीर्णतेची नोंद झाली आहे.यंदाही मुलींना बाजी मारत मुलांना मागे टाकले आहे. सीबीएसई बोर्डात यंदा 90 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
सीबीएसई (CBSE) बोर्डाचा इयत्ता 12वी निकाल जाहीर करण्यात आला असून परीक्षार्थी cbse.gov.in किंवा results.cbse.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे निकाल पाहू शकतात.तसेच हे निकाल उमंग ॲप, डिजिलॉकर ॲप, परीक्षा संगम पोर्टल आणि एसएमएस सुविधेद्वारे उपलब्ध आहेत.