झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांनी देखील आपल्याला जामीन मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी पार पडली. यावेळी कपिल सिब्बल यांनी सोरेन यांची बाजू मांडली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलेल्या जामीनाचे उदाहरण देण्यात आले. मात्र सुप्रीम कोर्टाने हेमंत सोरेन यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे.
हेमंत सोरेन यांनी आपल्या जामिनाची याचिका फेटाळल्याबद्दल झारखंड हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. न्यायमूरीत संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. मात्र निवडणुकीसाठी सध्या सुप्रीम कोर्टाने हेमंत सोरेन यांना जमीन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हेमंत सोरेन यांना सध्या तरी ईडी कोठडीतच मुक्काम करावा लागणार आहे.