लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान चालू आहे . आज दुपारी एक वाजेपर्यंत देशभरात ४०. ३२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर एकूण राज्यामधले मतदानाचे प्रमाण हे पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त आहे तर जम्मू आणि काश्मीरमध्ये मतदानाचे प्रमाण आतापर्यंत अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 51.87 टक्के मतदान झाले आहे , तर जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वात कमी 23.575 टक्के मतदान झाले.
दरम्यान, मध्य प्रदेशात 48.52 टक्के, आंध्र प्रदेशात 40.26 टक्के, बिहारमध्ये 34.44 टक्के, झारखंडमध्ये 43.8 टक्के, ओडिशामध्ये 39.30 टक्के, महाराष्ट्रामध्ये 30.85 टक्के, तेलंगणामध्ये 40.80 टक्के, तर उत्तर प्रदेशात 39.68 टक्के. मतदानाची नोंद झाली आहे.