आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. १० राज्यांमधील ९६ जागांसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान महाराष्ट्रात ११ जागांवर मतदान सुरु आहे. त्यापॆकी आज आपण पुणे लोकसभेसाठी किती टक्के मतदान दुपारी १ वाजेपर्यंत झाले आहे, त्याबद्दल जाणून घेणार आहोत. पुणे लोकसभेसाठी आतापर्यंत २६.४८ टक्के मतदान झाले आहे. पुणे लोकसभेसाठी तिरंगी लढत होत आहे. महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, तर महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पुणे लोकसभेसाठी असलेल्या विधानसभा मतदारसंघात किती मतदान झाले आहे, ते जाणून घेऊयात. पुण्यातील पर्वती भागात २७.१४ टक्के, कोथरूड भागात २९.१० टक्के, कसबा भागात ३१.१० टक्के, पुणे कॅंटोन्मेंट भागात २३.२१ टक्के आणि वडगाव शेरी या भागात २४.८५ टक्के व शिवाजीनगर भागात २३. २६ टक्के मतदान दुपारी एक वाजेपर्यंत झाले आहे. संध्याकाळी ७ पर्यंत किती टक्के मतदान होते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मात्र गेल्या तीन टप्प्यांमध्ये एकूणच सगळीकडे मतदानाही टक्केवारी कमी असल्याचे दिसून आले आहे