पुणे: ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज ऑडी क्यू३ बोल्ड एडिशन आणि ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक बोल्ड एडिशनच्या लाँचची घोषणा केली. बोल्ड एडिशन व्हर्जन्समध्ये विशिष्ट स्टायलिंगची भर करण्यात आली आहे आणि त्यांची विशिष्टता व अद्वितीय डिझाइन घटकांसह ऑडीप्रेमींचे लक्ष वेधून घेण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. ऑडी क्यू३ बोल्ड एडिशनची एक्स-शोरूम किंमत ५४,६५,००० रूपये आणि ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक बोल्ड एडिशनची एक्स-शोरूम किंमत ५५,७१,००० रूपये आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख श्री. बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, ”ऑडी क्यू३ आणि ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक आमच्या सध्याच्या सर्वाधिक विकी होणाऱ्या मॉडेल्स आहेत आणि ग्राहकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहेत. लक्झरी, कार्यक्षमता व वैविध्यतेचे परिपूर्ण संयोजन असलेल्या या दोन्ही मॉडेल्स आता बोल्ड एडिशनसह ऑफर करण्यात आल्या आहेत, ज्यामधून विशिष्ट स्टायलिंग घटक असलेल्या अधिक विशेष व स्पोर्टियर व्हेरिएण्टची खात्री मिळते. बोल्ड एडिशन्स रस्त्यावर अद्वितीय स्टेटमेंटची इच्छा असलेल्यांसाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत. मर्यादित युनिट्स उपलब्ध असण्यासह आम्हाला आशा आहे की, या मॉडेल्सची विक्री देखील अल्पावधीत समाप्त होईल.”
बोल्ड एडिशनची वैशिष्ट्ये: ब्लॅक स्टायलिंग पॅकेजमध्ये आकर्षक ब्लॅक डिझाइन आहे, ज्यामधून आकर्षकता दिसून येते. तसेच यामध्ये ग्लॉस-ब्लॅक ग्रिल, पुढील व मागील बाजूस ब्लॅक ऑडी रिंग्ज, ब्लॅक विंडो सराऊंड्स, ब्लॅक ओआरव्हीएम आणि ब्लॅक रूफ रेल्स आहेत.