आज महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होत आहे. राज्यातील नंदुरबार, जळगाव, बीड, अहमदनगर, पुणे, शिरूर, छत्रपती संभाजीनगर, रावेर, शिर्डी, मावळ, जालना या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरु झाले आहे. त्यामुळे आज अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे
तर आता चौथ्या टप्प्यातील दुपारी 3 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रात एकूण 42.35 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये सर्वात कमी मतदान पुण्यामध्ये झाले आहे.
पुणे – 35.61 टक्के
जळगाव – 42.15 टक्के
जालना – 47.51 टक्के
शिरूर – 36.43 टक्के
नंदुरबार – 49.91 टक्के
बीड – 46.49 टक्के
अहमदनगर – 41.35 टक्के
छ.संभाजीनगर – 43.76 टक्के
मावळ – 36.54 टक्के
रावेर – 45.26 टक्के
शिर्डी – 44.87 टक्के
दरम्यान, आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशभरात 96 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. देशात 96 तर महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होत आहे.