Maharashtra Rain Update : एकिकडे उन्हाचा तडाखा सुरू असताना आत अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
मुंबईसोबत आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रात 18 मे पर्यंत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्वात जास्त पाऊस पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.
सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.