राज्यात अनेक ठिकाणी वातावरणात बदल होत आहेत. राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. मुंबई आणि नवी मुंबईसह जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत असते. विक्रोळी, भांडुप, मुलुंड मोठा पाऊस कोसळत आहे. रस्त्यावर पाणी साचले आहे. जोरदार पावसामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. गेले काही दिवस मुंबईकर नागरिक हैराण झाले होते. जोरदार पावसामुळे मेट्रो देखील ठप्प झाली होती.
https://twitter.com/sagarcasm/status/1789970576141943166
दादर परिसरात धुळीचे वादळ निर्माण झाल्याने तिथे काहीशी दृश्यमानता कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यतात देखील जोरदार वारा सुटला होता. नागरिकांना आडोशाला जाण्यासाठी सुरक्षित जागांचा आसरा घ्यावा लागला. पुढील काही तासांत येथे जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वादळी वाऱ्यांमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे मेट्रोच्या ओव्हरहेड वायरवर बॅनर पडल्याने मेट्रो ठप्प झाली आहे.