आर.के. नारायण ह्यांच पूर्ण नाव रसिपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी.मुख्यत्वे करून आर.के नारायण म्हणून परिचीत आहे.त्यांचा जन्म १० ऑक्टोबर,१९०६ रोजी चेन्नई एका तमिळ ब्राह्मण कुटुंबात झाला.
१९३० मधे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पूर्णपणे लेखनाची कारकीर्द सुरू होण्यापूर्वी त्यांनी काही दिवस शिक्षक म्हणून काम केले.
आर.के नारायण यांच्या वडिलांचे नाव आर.व्ही. क्रिष्णस्वामी व आईं ज्ञाना अय्यर होते.वडील म्हैसूरच्या शाळेत मुख्यध्यापक होते. आठ अपत्यांपैकी क्रमांक दोन चे अपत्य होते.बालपणीचा काळ त्यांची आजी व मामा यांच्या समवेत गेला.फक्त सुट्टीत ते आई वडिलांकडे येत असत. लहान भाऊ जेमिनी स्टुडिओचे संपादक होते तर सगळ्यात लहान भाऊ आर.के लक्ष्मण हे प्रसिद्ध व्यंग चित्रकार होते.
लहानपणा पासून आर.के नारायण यांना वाचनाची अतिशय आवड होती.जेंव्हा जेंव्हा त्यांना वेळ मिळेल तेंव्हा तेंव्हा त्यांनी खूप वाचन केले.
सर्व सामान्य लोकांनाही त्यांच्या ‘ मालगुडी डेज ‘ हा लघु कथा संग्रह आहे. यात 32 कथा आहेत.या सर्व कथा दक्षिण भारतातील एका छोट्या खेड्यावर आधारित काल्पनिक कथा आहेत.यात मानवी स्वभावाचे विविध पैलू व त्याच्या छटांचे सुंदर वर्णन केले आहे. A snake in the grass ही त्यांची सर्वात लहान कथा आहे.अनेक अंधश्रध्दा व पद्धती वर आधारित कथा आहे.आधुनिक भारतीय साहित्यावर त्यांनी इंग्रजी मधून मुलक राज आनंद आणि राजा राव यांच्या बरोबर बरेच काम केले.त्यांचे बहुतांश लिखाण इंग्रजी मधून आहे.
त्यांच्या आयुष्याच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी ३४ कादंबऱ्या,२०० लघुकथा,२ प्रवास वर्णन,२ नाटक,१ संस्मरण त्याच प्रमाणे रामायण महाभारतावरही लेखन केले आहे.’स्वामी आणि मित्र ‘ ही त्यांची पहिली कादंबरी होती.
आर.के नारायण यांच्या जीवनात त्यांचे जवळचे मित्र ग्रॅहम ग्रिने यांचा खूप सहभाग आहे कारण त्यांनीच त्यांच्या पहिल्या चार पुस्तकांच्या प्रकाशनासाठी प्रकाशक मिळवले.
१९५८ मधे The Guide या त्यांच्या कादंबरीला अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणारा भारतीय साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.त्यांच्या साहित्याला मान्यता प्राप्त पुरस्कार मिळाले. ए.सी बेन्सन मेडल हे रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर कडून मिळालेल्या अतिशय मानाचा पुरस्कार आहे.भारतीय साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांच्या मृत्यूपूर्वी भारत सरकारने त्यांना पदं विभूषण देऊन गौरविले होते.१९६७ मधे उत्कृष्ठ कथेसाठी (गाईड चीत्रपट) त्यांना फिल्म फेअर अवॉर्ड मिळालं.राज्य सभेसाठी पण त्यांचे मानांकन केले होते.
भारतीय साहित्यातील त्यांच्या साहित्य निर्मितीमुळे कोणत्याही वयोगटातील वाचकांच्या मनावर कधीही न पुसणारा ठसा त्यांनी उमटवला आहे.
वयाच्या ९४ वर्षी चेन्नईला त्यांच्या राहत्या घरी १३ मे २००१ रोजी त्यांचे निधन झाले.
नीरजा देशमुख,नाशिक
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत