देशाचे वातावरण सतत बदलत आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. मात्र जगातील आणखी एका देशात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी महापूर आलेला आहे. इंडोनेशियामध्ये मुसळधार पावसामुळे त्या ठिकाणी महापूर आला आहे. इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर मुसळधार पाऊस आणि अचानक आलेल्या पुरामुळे आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक लोक बेपत्ता आहेत.
नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट एजन्सीचे प्रवक्ते अब्दुल मुहारी यांनी सांगितले की, पश्चिम सुमात्रा प्रांतातील चार जिल्ह्यांतील अनेक गावे शनिवारी मध्यरात्री , पावसामुळे निर्माण झालेल्या भूस्खलनामुळे आणि मारापी पर्वताच्या थंड लावा उतारावरून आलेल्या चिखलामुळे पूर आला. या पुरात अनेक लोक वाहून गेले असून १०० हून अधिक घरे आणि इमारती पाण्याखाली गेल्याचे त्यांनी सांगितले. थंड लावा हे ज्वालामुखीजन्य पदार्थ आणि ढिगाऱ्यांचे मिश्रण आहे जे पावसाच्या वेळी ज्वालामुखीच्या उतारावरून खाली वाहते.