अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत ३१५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे येथील परिसरात काही दिवसांपासून पूरस्थिती निर्माण झाली आहे. खेड्यापाड्यातील शेती, रस्ते, घरे वाहून गेली आहेत आणि पिके उद्ध्वस्त झाली आहेत. अफगाणिस्तानातील अनेक राज्यांमध्ये वीज देखील नाही.
अफगाणिस्तानमध्ये दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 315 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तालिबानी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की मृतांचा आकडा अजून वाढू शकतो. अमेरिकन मीडिया CNN च्या मते, वर्ल्ड फ्लड प्रोग्राम (WFP) ने 12 मे रोजी बदख्शान, घोर, बागलान आणि हेरातमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगितले.
मुसळधार पावसामुळे 1600 लोक जखमी झाले असून 2000 हून अधिक घरे वाहून गेली आहेत. डब्ल्यूएफपीने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, अचानक आलेल्या पुरामुळे अफगाणिस्तानचा नाश झाला आहे .तसेच बागलान मध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.
बागलानमध्ये 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बागलानकडे जाणारा रस्ता वाहून गेला आहे, त्यामुळे तेथे मदत करण्यास विलंब होत आहे. तेथून लोकांना बाहेर काढण्यासाठी आता लष्कर पाठवण्यात आले आहे.
अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझाई यांनीही पुरामुळे बाधित झालेल्यांसाठी मदतीची मागणी केली आहे.X वरील एका पोस्टमध्ये, करझाई यांनी म्हटले आहे की, “बघलान आणि देशाच्या इतर प्रांतांमध्ये आलेल्या पुरामुळे आपल्या अनेक नागरिकांचे वैयक्तिक आणि आर्थिक नुकसान झाले हे अतिशय दुःखद आहे. मी पीडितांच्या कुटुंबियांना माझ्या संवेदना व्यक्त करतो आणि मला आशा आहे की मदत संस्था आणि राष्ट्रीय व्यापारी पीडित कुटुंबांना मदत करतील. ”
दरम्यान, ज्यांनी पुरात नातेवाईक गमावले आहेत त्यांनी अफगाणिस्थान सरकार आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना या आपत्तीमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्याचे आवाहन केले आहे. आंतरराष्ट्रीय बचाव समिती (IRC) च्या म्हणण्यानुसार लाखो लोक या पुरामध्ये अडकून पडले आहेत, त्यांच्यासाठी ही बचाव समिती आपत्कालीन मदतीची व्यवस्था करत आहे.