लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने हिमाचल प्रदेशच्या मंडी या लोकसभा मतदार संघातून अभिनेत्री कंगना रानौतला तिकीट दिली आहे. आज कंगना रानौतने आपला लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी तिची आई आणि बहीण देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीचे श्रेय हे मंडी येथील जनतेला दिले.
कंगना रानौत म्हणाली, ”मंडीच्या जनतेचे प्रेम होते जे मला ताकद देते. मी ज्याप्रमाणे अभिनय क्षेत्रात माझी ओळख निर्माण केली तशीच राजकारणात देखील करेन अशी मला खात्री आहे. कंगना रानौत म्हणाली, ”मंडीची जनता आणि माझ्यावर असलेले त्यांचे प्रेम मला इथे घेऊन आली आहे. आज आपल्या देशात महिला प्रत्येक क्षेत्रात आपली ओळख निर्माण करत आहेत. मात्र काही वर्षांपूर्वी मंडी येथे स्त्री भ्रूण हत्येचा खूप घटना घडल्या. आज मंडी येथील महिला सैन्यात आहेत.”
पुढे कंगना म्हणाल्या, “काँग्रेस पक्षाची देशविरोधी मानसिकता ही देशासाठी चिंतेची बाब आहे. कंगनाची आई आशा राणौत म्हणाल्या, “कंगनाला पाठिंबा देण्यासाठी लोक इथे आले आहेत. आम्ही नक्कीच जिंकू. तिने लोकांसाठी खूप काम केले आहे आणि भविष्यातही करेल.” २० तारखेला हिमाचल प्रदेशमध्ये मतदान होणार आहे. हे ५ व्या टप्प्यातील मतदान असणार आहे.