सध्या राज्यातील वातावरण सतत बदलत आहे. काही ठिकाणी कडक उन्हाळा तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. काल मुंबई, पुणे यांसह अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. पुढील काही दिवसात राज्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काल घाटकोपर, दादर, ठाणे अशा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे जीवितहानी व वित्तहानी देखील झाली आहे. आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
https://twitter.com/satarkindia/status/1790306285570928644
वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याच्या शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सातारा, सोलापूर , छ. संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, जालना, नागपूर, वर्धा, बुलढाणा, वाशिम, ठाणे, रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. गेले काही दिवस राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.