देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये सध्या अफवांचे सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील मोठ्या शाळांमध्ये बॉम्ब ठेवल्याची अफवा समोर आली होती. त्यामुळे संपूर्ण दिल्ली हादरले होते. सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली होती. ईमेल द्वारे ही धमकी देण्यात आली होती. त्यानंतर आता दिल्लीतील मोठ्या रुग्णालयांना धमकीचा ईमेल आला आहे. दिल्लीमधील एकदम बड्या बड्या रुग्णालयात हा ईमेल आल्याचे समजते आहे.
मोठ्या रुग्णालयांना अशा बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल प्राप्त झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी तपास सुरु केला आहे. ईमेल आल्याचे कळताच पोलीस, बॉम्ब स्क्वाड आणि इतर यंत्रणा सर्व रुग्णालयात दाखल झाल्या आणि तपास सुरु करण्यात आला. यापूर्वी १ मे रोजी दिल्लीमध्ये १५० पेक्षा जास्त शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती. त्यामुळे दिल्लीत एकच खळबळ उडाली होती.