देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण नाशिक लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास आघाडीने, वंचित बहुजन आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे. राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
आज आपण नाशिक लोकसभा मतदार संघाबद्दल जाऊन घेणार आहोत. महायुतीने नाशिक लोकसभेसाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट दिले आहे. तर महाविकासआघाडीने ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना तिकीट दिले आहे. नाशिकच्या जागेसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. दरम्यान शांतिगिरी महाराज यांनी नाशिकमध्ये अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. मात्र नाशिकच्या जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवार जाहीर करण्यासाठी पक्षांतर्गत नाराजी देखील पाहायला मिळाली. महायुतीकडे अनेक दिवस उमेदवार कोणत्या पक्षाचा असणार हे ठरत नव्हते.
शांतिगिरी महाराजानी अपक्ष उभे राहू नये यासाठी महायुतीने अनेक प्रयत्न केले. त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. मात्र शांतिगिरी महाराजानी निवडणूक लढविण्याचा आपला निर्णय कायम ठेवला आहे. यंदा ते बादली या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढविणार आहेत. वंचित बहुजन आघाडीने कारण गायकर यांना तिकीट दिले आहे. मात्र शांतिगिरी महाराज यांच्यामुळे मतांचे विभाजन होऊन महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना फटका बसण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये एकूण ३९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यातील ३६ अर्ज वैध ठरले आहेत.
नाशिकच्या जागेवर महायुतीमध्ये तिन्ही पक्षांकडून दावा केला जात होता. छगन भुजबळ यांचे नाव देखील चर्चेत होते. त्यानंतर भुजबळ यांनी माघार घेतली. अखेर ही जागा शिवसेनेकडे गेली आणि हेमंत गोडसे यांना तिकीट मिळाले. हेमंत गोडसे यांना तिकीट मिविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्यांनी अनेकदा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर त्यांना तिकीट मिळाले. मात्र माविआकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी खूप दिवसांनी महायुतीने आपला उमेदवार दिला आहे. नाशिक लोकसभेत महायुतीकडेच आमदारांची संख्या जास्त असल्याने येथे त्यांचे पारडे जड असणार आहे. मात्र पक्षांतर्गत नाराजी, उमेदवार जाहीर करण्यास झालेला उशीर, व हेमंत गोडसे यांना तिकिटासाठी करावा लागलेला संघर्ष , अपक्ष उभे राहिलेले शांतिगिरी महाराज , वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार यांना मिळणारे मते कोणासाठी फायद्याची व कोणासाठी नुकसानकारक ठरणार हे ४ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.