सध्या लोकसभा निवडणुकीचा काळ सुरू आहे. ४ टप्प्यातील मतदान पूर्ण
झाले आहे. ५ व्या टप्प्यातील मतदान २० तारखेला होणार आहे. दरम्यान याच
पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘एबीपी
माझा’
या
वृत्तवाहिनीच्या ‘माझा व्हिजन‘ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी
त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. मुंबईतील मराठी मतदार हे भाजपच्या बाजूने
असल्याचे ते म्हणाले. तसेच त्यांनी अजित पवारांवर देखील भाष्य केले.
फडणवीस म्हणाले, विरोधकांकडून
लोकांमध्ये भीती निर्माण केली जात आहे. सुरुवातीला दलितांमध्ये संविधान बदलणार अशी
भीती तयार केली गेली. मात्र त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही. राज्यात
समाजासमाजामध्ये दुफळी निर्माण होणे दुर्दैवी आहे. तसेच मराठी मतदार हा भाजपच्या मागे
उभा असून, मोदींसाठी ते भाजपाला मतदान करतात.
अजित पवारांबद्दल बोलताना देवेंद्र
फडणवीस म्हणाले, ”शरद पवारांसोबत राहून आपले अस्तित्व नाही आणि भविष्यही नाही हे
समजल्यानंतर अजित पवार आमच्यासोबत आले.” राज्यात महायुतीचे सरकार आहे. या
सरकारचे नेतृत्व हे मुख्यमंत्रीच आहेत.