आम आदमी पक्षाच्या नेत्या स्वाती मालीवाल यांच्याबाबत झालेल्या गैरवर्तनाबाबत पक्षाचे नेते संजय सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गैरवर्तन झाल्याची गोष्ट स्वीकारत संजय सिंह म्हणाले, ही घटना अतिशय निंदनीय आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या संपूर्ण घटनेची दखल घेतली असून कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, या घटनेवर स्वाती मालीवाल यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
काल स्वाती मालीवाल केजरीवाल यांनी भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या, असे आप खासदार आणि नेते संजय सिंह यांनी सांगितले. त्यांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल केजरीवाल यांची वाट पाहत बाहेर थांबल्या होत्या. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या पीएने स्वामी मालिवाल यांच्याबरोबर गैरवर्तन केले. ही अतिशय निंदनीय घटना आहे. केजरीवालांनी याची दाखल घेतली असून, ते कडक कारवाई करतील असे संजय सिंह म्हणाले.
स्वाती मालिवाल यांच्याबरोबर झालेल्या गैरवर्तनावरून भाजपाने आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली आहे. ३६ तासांपासून हे शांत का होते. एका राज्यसभा खासदाराबरोबर केजरीवालांच्या घरी पीएकडून दुर्व्यव्हार झाला तुम्ही आता त्याची दाखल घेत आहात. यावर कारवाई झालीच पाहिजे. तसेच राजकीय दबाव टाकून स्वाती मालिवाल यांना पोलिसांकडे तक्रार करण्यास रोखले जास्त असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.