लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी येथून
निवडणूक लढविणार आहेत. आज त्यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी वाराणसीत शहरात पोचले आणि त्यांनी
दशस्वमेध घाटावर प्रार्थना केली. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोदी म्हणाले,
या
ऐतिहासिक जागेची तसेच येथील जनतेची सेवा करणे हा माझ्यासाठी सन्मान आहे. येत्या
काळामध्ये हा वेग अधिक वाढेल.
पंतप्रधान मोदींनी क्स वर एक पोस्ट शेअर केली. त्यात मोदी म्हणाले,
””वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज
दाखल केला. या ऐतिहासिक जागेवरील जनतेची सेवा करणे हा सन्मान आहे. लोकांच्या
आशीर्वादाने गेल्या दशकभरात उल्लेखनीय कामगिरी झाली आहे. कामाचा हा वेग येणाऱ्या
काळात आणखी वाढेल.”
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी
पंतप्रधान मोदी वाराणसीत शहरात पोचले आणि त्यांनी दशस्वमेध घाटावर प्रार्थना केली.
तसेच वाराणसीतील कालभैरव मंदिरातही पूजा केली. याबाबत माध्यमांशी बोलताना
पंतप्रधान म्हणाले की, त्यांचे काशी (वाराणसीचे दुसरे नाव) सोबतचे नाते अविभाज्य आणि
अतुलनीय आहे. आपल्या एस पोस्टमध्ये, पीएम मोदींनी काशीबद्दलचे त्यांचे
प्रेम आणि गेल्या काही वर्षांत गंगा नदीशी त्यांचे नाते कसे बहरले याबद्दल बोलताना
त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार पंतप्रधान
मोदी यांनी आज थोड्या वेळापूर्वी वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात
उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 1
जून
रोजी वाराणसीमध्ये मतदान होणार आहे तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.