जेव्हा भाजपला 300 जागा मिळाल्या तेव्हा त्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधले आणि आता लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 जागा मिळाल्यानंतर वाराणसीतील ज्ञानवापी मशीद पाडून मंदिर बनेल तसेच आता मथुरा येथील कृष्णजन्मभूमी बनेल असे प्रतिपादन आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी बिहारमध्ये बोलताना केले आहे. तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरचा (पीओजेके) भारतात समावेश केला जाईल, असेही ते म्हणाले आहेत.
ते काँग्रेसवर टीका करत म्हणाले की, काँग्रेसच्या राजवटीत पाकव्याप्त काश्मीरबाबत संसदेत कोणतीही चर्चा झाली नाही. “काँग्रेसचे सरकार असताना आम्हाला सांगण्यात आले की एक काश्मीर भारतात आहे आणि दुसरे पाकिस्तानमध्ये. पाकिस्तानने ‘व्याप्त काश्मीर’ आहे, ते आमचे आहे’ अशी चर्चा आमच्या संसदेत कधीच झाली नाही. मात्र सध्या तिथे आंदोलने होत आहेत. पीओकेमध्ये दररोज लोक भारताचा तिरंगा हातात धरून निषेध करत आहेत, जर मोदीजींना 400 जागा मिळाल्या तर पीओके देखील भारताचा होईल, “हिमंत पुढे म्हणाले.
भाजप सरकार आरक्षणाला अधिक बळ देण्याचे काम करत आहे, असेही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादन केले.
“पीएम मोदी हे स्वत: ओबीसी प्रवर्गातून आले आहेत. भाजप 10 वर्षांपासून सत्तेत आहे. आरक्षणाला अधिक बळ देण्यासाठी आमचे सरकार काम करत आहे. काँग्रेसला एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण संपवून मुस्लिमांना आरक्षण द्यायचे आहे, ज्याची सुरुवात त्यांनी कर्नाटकात,केली आहे. ” असे ते पुढे म्हणाले आहेत .
तत्पूर्वी, पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील (पीओजेके) निदर्शने याबाबत बोलताना , परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी पुनरुच्चार केला की “ते भारत आहे आणि नेहमीच राहील,”
पीओजेकेमध्ये बेकायदेशीरपणे तैनात असलेल्या पाकिस्तान निमलष्करी रेंजर्सनी सोमवारी अनेक आंदोलकांना गोळ्या घालून ठार केले आणि अनेक डझनभर जखमी झाले आहेत या घटनेमुळे परिसरातील अनेक स्थानिक जखमी झाले, कारण हजारोंच्या संख्येने स्थानिक लोक वीज बिलावरील कर, सबसिडीतील कपात आणि पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचे भत्ते आणि विशेषाधिकार संपुष्टात आणण्यासाठी त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते.