लष्कर प्रमुख, भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय सैन्य दलाचे पहिले प्रमुख अश्या विशेषणांनी ओळखले जाणारे फील्ड मार्शल जनरल के एम करिअप्पा यांची आज पुण्यतिथी आहे. ..राजपूतरेजिमेंटमध्ये त्यानी काम केले. चीफ मार्शल हे एक स पद आहे..ते आत्ता पर्यंत पाच जणांनाच मिळाले आहे…या औपचारीक पदाचे पहिले मानकरी करिअप्पा आहेत..करिअप्पा यानी सैन्यातील उत्तम कामगिरीचे 5 STAR तर मिळवले होतेच शिवाय भारत ,पाकिस्तान. युध्दात विशेष पराक्रम केला होता..त्या निमित्ताने त्याना हा बहुमान दिला गेला होता..
त्यांचा कार्यकाळ 1949 ते 1953.. पण ह्या पदावर असणारी व्यक्ति मरेपर्यंत कार्यरत असते निवृत्त होत नाही.
जनरल करीअप्पा यांच्या आयुष्यातल्या काही महत्त्वाच्या घटना येथे मुद्दाम सांगाव्याशा वाटतात .आपल्या स्वतःच्या खाजगी कामांसाठी सरकारी वाहन वापरणं हे जनरल करिअप्पांच्या शिस्तीच्या स्वभावाला पटत नव्हते.
करिअप्पा यांचा मुलगा शाळेतून मिलिटरी ट्रक मधून घरी येत असे.
( सैन्यातील जवानांच्या मुलांसाठी ह्या ट्रकची सोय असे )एकदा मिलिटरी ट्रक काही कारणाने शाळेमध्ये जाऊ शकली नाही. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी करीअप्पा यांच्या मुलासाठी स्पेशल स्टाफ कार पाठवली. ही गोष्ट नंतर काही दिवसांनी जेव्हा करीअप्पा यांच्या निदर्शनाला आली तेव्हा करीअप्पांनी लगेचच त्या कारचं बिल बनवायला सांगितलं आणि ते बील त्यांच्या पगारातून कापा असेही आदेश दिले.
1965 ला पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धामध्ये करिअप्पा यांचा मुलगा नंदू करीआप्पा जे स्वतः फायटर पायलट होते त्यांचं विमान पाकिस्तान मध्ये पाडलं गेलं आणि नंदू करीअप्पांना युद्ध कधी बनवलं. जेव्हा हे पाकिस्तानच्या लक्षात आलं की नंदू करीअप्पा हे जनरल करीअप्पांचे पुत्र आहेत त्या वेळेला पाकिस्तान राष्ट्रपती अयुब खान ( ब्रिटीश सैन्यात असताना अयुब खान यांचे फिल्ड मार्शल करिअप्पां हे boss होते) ह्यांनी स्वतः निरोप पाठवला करीअप्पा यांना की तुम्हाला वाटत असेल तर मी तुमच्या मुलाला एक तासाच्या आत सोडतो. तेव्हा करिप्पांनी त्यांना उत्तर असं दिलं जे सगळे युद्ध कैदी आहेत ती सगळीच माझी मुलं आहेत सोडायचं असेल तर सगळ्यांनाच सोडा.
एकदा अमृतसर येथे फॅमिली वेल्फेअर सेंटरच्या एका कार्यक्रमात करीअप्पा बोलत होते तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांना उद्देशून ते म्हणाले, मै सब माताओंको विनंती करता हु की आप दो पुत्रोंकी माता बनो. दोनो में से एक पुत्र आपके फॅमिली की देखभाल करेगा और एक पुत्र आप मुझे दे दीजिए।
अर्थातच पर्यायाने एक मुलगा भारतीय सैन्यासाठी पाठवा ही विनंती त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या महिलांना केली.
असे धुरंधर व्यक्तीमत्व फिल्ड मार्शल करिअप्पा यांच होते.
असेच चीफ मार्शल ही उपाधी मिळवणारी दुसरी व्यक्ति म्हणजे माणेकशा..असा दैदीप्यमान आपल्या सैन्यदलाचा इतिहास आहे..
***जयतु भारतम्***
डाॅ.अनिता कुलकर्णी , नाशिक
सौजन्य -समिती संवाद,पश्चिम महाराष्ट्र प्रांत