CM Yogi Adityanath Mother : नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आईला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना जेरियाट्रिक वॉर्डमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. एम्सच्या व्यवस्थापकाने सांगितले की, सावित्री देवी यांना मंगळवारी दुपारी 12 वाजता दाखल करण्यात आले आहे. वृद्धापकाळात उद्भवणाऱ्या समस्यांमुळे त्यांना नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे.
एम्सच्या विविध विभागातील डॉक्टरांनी योगी आदित्यनाथ यांची आई सावित्री देवी यांच्या प्रकृतीची तपासणी केली आहे. 85 वर्षीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आई सावित्री देवी यांना मंगळवारी दुपारी 12 वाजता एम्सच्या जेरियाट्रिक वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. एम्स प्रशासनाचे म्हणणे आहे की, वृद्धापकाळात उद्भवणाऱ्या समस्यांमुळे सावित्री देवी नियमित तपासणीसाठी येथे पोहोचल्या आहेत.
दरम्यान, याआधी नुकतेच मदर्स डेच्या दिवशी सीएम योगींनी एक फोटो शेअर करून आईची आठवण काढली होती. सीएम योगींनी आईच्या पायाला स्पर्श करतानाचा फोटो शेअर केला होता. आपल्या सोशल मीडियावर तो फोटो शेअर करताना सीएम योगींनी लिहिले होते की, “सर्व मातृशक्ती, आपल्या सर्वांची पहिली शाळा, कुटुंबाच्या समृद्धीचा आधार, सेवा, त्याग आणि मातृप्रेमाचे मूर्तिमंत मातृदिनाच्या शुभेच्छा!”