लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. ममता बॅनर्जी या ‘आई, माती आणि मनुष्य’ या आश्वासनावर सत्तेत आल्या व मुख्यमंत्री झाल्या. मात्र त्या आता ‘मुल्ला, मदरसा आणि माफिया’ यांना बढावा देत आहेत. एका प्रचारसभेला संबोधित करताना अमित शहा यांनी टीएमसीने ईमामांना मासिक मानधन दिले परंतु पुजारी आणि मंदिरांच्या संरक्षकांना एक पैसाही दिला नाही, असा आरोप केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, ”टीएमसी माती, मनुष्य आणि आई या विश्वासावर सत्तेत आली होती. मात्र आता त्यांचे लक्ष मुल्ला, मदरसा आणि माफिया यांच्यावर आहे. या ठिकाणी ईमामांना मानधन दिले जाते. मात्र देवळाच्या पुजार्यांना आणि मंदिराच्या रक्षकांना काहीही मिळत नाही. मुस्लिम समाजाच्या मिरवणुकीत कोणताही अडथळा येत नाही मात्र दुर्गा पूजा, काली पूजेच्या मिरवणुकीत नियमित अडथळे निर्माण होत आहेत.”
अमित शहा यांनी राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ चे निमंत्रण स्वीकारले नाही यावरून अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. अमित शाह म्हणाले , ”औपचारिक निमंत्रण दिल्यानंतर कोणालातरी खुश करण्यासाठी उदघाटन समारंभात सहभागी झाले नाहीत.” तसेच त्या CAA कायद्यावरून देखील नागरिकांची दिशाभूल करत आहे.