गेले काही दिवस राज्यात अवकाळी पाऊस कोसळत आहे. वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या गडगडाटासह जोरदार, मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे वाहन केले आहे. आज देखील राज्यात अवकाळी दिवसाचा फटका बसणार आहे. अवकाळीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आजच्या हवामानाबद्दल जाणून घेऊयात. आजही राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्या भागात पावसाचा फटका बसू शकतो ते पाहुयात.
राज्याच्या अनेक भागात गारपीट आणि अवकाळी पाऊस होत आहे. येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबई,ठाणे आणि पालघरसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. जळगाव, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता आहे. राज्यात १९ मे पर्यंत अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.