Anurag Kashyap : बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप हा नेहमी काहीना काही कारणांमुळे चर्चेत असतो. तो त्याच्या कामाशिवाय त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. कारण अनुरागने आत्तापर्यंत दोनदा लग्न केलं आहे. त्याचं पहिलं लग्न फिल्म एडिटर आरजी बजाजसोबत झालं होतं तर दुसरं लग्न अभिनेत्री कल्कि कोचलिनसोबत झालं होतं.
अनुराग कश्यपचे दोन्ही लग्न टिकले नाहीत त्यामुळे तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिला आहे. तर आता तो पुन्हा एकदा त्याच्या लग्नावरूनच चर्चेत आला आहे. कारण अनुरागच्या लेकीने त्याला तिसऱ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारला आहे.
नुकतीच अनुरागने त्याची लेक आलिया कश्यपच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी आलियाने अनुरागच्या दोन्ही लग्नाबाबत भाष्य केलं आणि त्याला तिसऱ्यांदा लग्न करण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना अनुराग म्हणाला, “मी नेहमी कामाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करत असतो. जर मी यूरोपियन असतो आणि तिथेच राहून मी सिनेमा बनवत असतो तर कदाचित माझं रिलेशन खूप चांगलं असतं. कारण तिथे रॉयल्टी सिस्टम असते आणि पैसे देखील येतात. पण इथे रॉयल्टि आणि काही सिस्टमदेखील नाही.”
अनुरागने स्वत:ला वाईट वडील असल्याचंही ठरवलं. तो आलियाला म्हणाला की, “मी नेहमी तुझ्यासोबत वडिलांपेक्षा मित्रासारखा राहिलो आहे. मला माहिती आहे की मी वडिल म्हणून कमी पडलोय आणि तुझी आई मात्र आईसारखीच राहिली आहे. काही वर्ष तर ती माझीही आई बनून राहिली होती. त्यामुळे मला वाटतं की मी एक वाईट वडिला आहे.”
पुढे आलिया मजेने अनुरागला म्हणते की, “मला नेहमी एक भाऊ किंवा बहीण हवी होती. मी लहानपणापासून एकुलती एक आहे. त्यामुळे मला वाटत होतं की तू किंवा आई तुमच्या घटस्फोटानंतर पुन्हा कोणासोबत तरी रिलेशनमध्ये येतील आणि मला एक बहिण किंवा भाऊ मिळेल.” आलियाचं हे मत ऐकताच ‘तुझा बाबा आता म्हातारा झाला आहे’, असं अनुराग म्हणतो. दरम्यान, सध्या अनुराग आणि आलियाचा हा पॉडकास्ट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.