लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे स्टार प्रचारक देशभरात प्रचार सभा घेत आहेत. नुकतेच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिल्लीतील तीन जागांसाठी प्रचार सभा घेतली. शिवराज सिंह चौहान यांनी ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मनोज तिवारी यांच्या समर्थनार्थ आयोजित महिला परिषदेला संबोधित केले. पूर्व दिल्ली लोकसभा उमेदवार हर्ष मल्होत्रा आणि नवी दिल्ली भाजपच्या उमेदवार बन्सुरी स्वराज यांच्या समर्थनार्थ त्यांनी प्रचार सभांना संबोधित केले.
प्रचार सभेत बोलताना शिवराज सिंग चौहान म्हणाले, ”भारताच्या सनातन संस्कृतीत प्रत्येक स्त्री ही देवीची मूर्ती आहे आणि मुली या साक्षात देवी आहेत. मध्यप्रदेशच्या मातीवर कोणताही कार्यक्रम आयोजित केला जातो, तेव्हा आधी मी मुलींची पूजा करतो, त्यांचे पाय धुतो आणि जेव्हा मी माझ्या कपाळावर पाणी लावतो तेव्हा माझ्या कामाची ऊर्जा अनेक पटींनी वाढते. जिथे माता, बहिणी आणि मुलींचा आदर केला जातो, तिथे देवही वास करतो. मी दोन्ही हात जोडून, डोके टेकवून बहिणींना नमस्कार करतो. ही इंडी आघाडी ती देशाचे आणि जनतेचे कधीही भले करू शकत नाही. ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार यांचे नाव न घेता माजी मुख्यमंत्री म्हणाले की, भारत तेरे तुकडे होंगे आणि दहशतवाद्यांचा गौरव करणाऱ्या घोषणा देणाऱ्यांना जनता कधीही स्वीकारणार नाही.”
भारतीय जनता पक्ष जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील याची खात्री आहे, मात्र काँग्रेस आणि इंडी आघाडीने आपला पंतप्रधान कोण आहे हे सांगावे, असे शिवराजसिंग चौहान. पंतप्रधान कोण होणार ते नंतर ठरवू असे ते सांगतात,काँग्रेस आणि इंडिया आघाडी देशाचे व जनतेचे कधीही भले करू शकत नाही. त्यांना देशाच्या विकासाशी आणि जनतेच्या कल्याणाशी काहीही देणेघेणे नाही.