Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानला सतत धमक्या येत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचे प्रकरण समोर आले होते. तसेच या गोळीबारामागे बिश्नोई गँगचा हात असल्याचंही समोर आलं होतं. अशातच आता बिष्णोई समाज सलमान खानला माफ करण्यास तयार असल्याची बातमी समोर आली आहे.
अखिल भारतीय बिश्नोई महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी म्हटले आहे की, त्यांचा समाज सलमान खानला माफ करण्यास तयार आहे. पण, त्याला बिश्नोई समाजाची एक अट मान्य करावी लागेल.
27 वर्षांनंतर बिश्नोई समाजाचे अध्यक्ष देवेंद्र बुडिया म्हणाले की, “शो मी अली खानने दिलेल्या माफीने काही फरक पडत नाही. तशीच यापूर्वी राखी सावंतनेही माफी मागितली होती. मात्र आरोपी सलमान खानने स्वत:ला माफी मागायची आहे, असा प्रस्ताव द्यावा, मग त्याने मंदिरासमोर येऊन माफी मागावी आणि मग समाज त्याला माफ करू शकेल.”
“आपल्या 29 नियमांमध्ये हृदयाला क्षमा करण्याचा नियम आहे याद्वारे आपले महान महंत, साधू नेते, बिष्णोई समाजाचे प्रमुख पंच सर्वजण एकत्रितपणे विचार करू शकतात आणि त्यांना क्षमा करू शकतात. परंतु त्यासाठी सलमान खानला मंदिरासमोर यावे लागेल आणि म्हणावे लागले की, शपथ घेऊन सांगतो की असे काम तो पुन्हा करणार नाही आणि पर्यावरण आणि वन्यजीवांचे नेहमीच संरक्षण करेल. जर तो ही अट मान्य करायला तयार असेल तरच त्याला माफ करता येईल”, असेही देवेंद्र बुडिया म्हणाले.
दरम्यान, सलमान खानने 1998 मध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काळविटाची शिकार केली होती. त्यामुळे बिश्नोई समाज सलमान खानवर प्रचंड नाराज आहे. काळवीट शिकार प्रकरणी बिश्नोई समाजाच्या नाराजीमुळे लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती.