आम आदमी पक्षाच्या नेत्या स्वाती मालीवाल यांच्याबाबत झालेल्या
गैरवर्तनाबाबत पक्षाचे नेते संजय सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गैरवर्तन
झाल्याची गोष्ट स्वीकारत संजय सिंह म्हणाले, ही घटना अतिशय
निंदनीय आहे. दरम्यान स्वाती मालिवाल यांचे पती नवीन जयहिंद यांनी भाष्य केले आहे.
नवीन जयहिंद यांनी संजय सिंह यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केवजरीवाल यांचा
पोपट असे संबोधले आहे. तर केजरीवाल यांच्यावर गुन्हा दाखल होयला हवा असे त्यांनी
म्हटले आहे.
एएनआयशी बोलताना नवीन जयहिंद यांनी बुधवारी आरोप केला की, अरविंद
केजरीवाल यांचे घर हे मुख्यमंत्र्यांचे घर नसून प्रत्यक्षात ‘गटर हाऊस’ आहे. नवीन
जयहिंद बोलताना म्हणाले, ”तुम्ही त्याला सीएम हाऊस म्हणता;
ते
खरं तर गटार हाऊस आहे. ही एक धोकादायक घटना आहे. हा एक मोठा घोटाळा आहे. अरविंद
केजरीवाल यांच्यावर एफआयआर दाखल व्हायला हवा कारण हे त्यांच्या घरी घडले आहे.”
स्वाती मालीवाल केजरीवाल यांनी
भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या, असे आप खासदार
आणि नेते संजय सिंह यांनी सांगितले. त्यांच्या निवासस्थानी स्वाती मालिवाल
केजरीवाल यांची वाट पाहत बाहेर थांबल्या होत्या. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या पीएने
स्वामी मालिवाल यांच्याबरोबर गैरवर्तन केले. ही अतिशय निंदनीय घटना आहे.
केजरीवालांनी याची दाखल घेतली असून, ते कडक कारवाई करतील असे संजय सिंह
म्हणाले.