PM Modi Road Show In Mumbai : लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या चौथ्या टप्प्यातील मतदान संपले आहे. आता मतदानाचे आगामी टप्पे पाहता आज (15 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ मुंबईत रोड शो करणार आहेत. तर पीएम मोदींच्या या रोड शोच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी अनेक मार्गांमध्ये बदल केले आहेत.
पीएम मोदींचा रोड शो मुंबई नॉर्थ ईस्ट मधील भागात आयोजित करण्यात आला आहे जो सुमारे तीन किलोमीटर लांबीचा असणार आहे.
तुम्ही जर संध्याकाळी काही कामासाठी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर बाहेर जाण्यापूर्वी वाहतुकीत झालेले बदल नक्की वाचा. पंतप्रधान मोदींचा रोड शो लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत अनेक मार्गांमध्ये बदल केले आहेत.
हे रस्ते राहणार बंद
मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एलबीएस गांधी नगर जंक्शन ते नौपाडा जंक्शनपर्यंत वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे. माहुलघाटकोपर रोडवरील मेघराज जंक्शन ते आरबी कदम जंक्शन हा रस्ता बंद राहणार आहे. तसेच घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यानच्या एजीएल रोडवरही वाहनांची वाहतूक बंद राहणार आहे. हिरानंदानी कैलास ते गुलाटी पेट्रोल पंप जंक्शनकडे जाणारी वाहनांची वाहतूक बंद राहील. सोबतच सर्वोदय जंक्शनच्या दिशेने गोळीबार ग्राउंड आणि घाटकोपर मेट्रो स्टेशन (प.) च्या दिशेने वाहनांची वाहतूकही बंद राहील.
हे असतील पर्यायी मार्ग
ईस्टर्न एक्सप्रेस हायवे
पश्चिम द्रुतगती महामार्ग
अंधेरी-कुर्ला रोड
साकी विहार रोड
MIDC सेंट्रल रोड
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड
झिऑन वांद्रे लिंक रोड
जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड