इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर आलेल्या पुरामुळे मृतांचा आकडा ५२ वर
पोहोचला आहे. बचाव कर्मचाऱ्यांनी मंगळवारी पूरग्रस्त गावांमध्ये ढिगाऱ्याखाली दबलेल्या
लोकांचा शोध सुरू ठेवला आहे.कदाचित मृतांचा आकडा वाढू शकतो. शनिवारी
मध्यरात्रीपूर्वी पश्चिम सुमात्रा प्रांतातील चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस,
भूस्खलन
आणि माऊंट मेरापीवरील लाव्हा यांनी कहर केला.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे प्रवक्ते अब्दुल मुहारी यांनी
सांगितले की, ”पुरात मोठ्या प्रमाणात लोक वाहून गेले असून घरे आणि इमारती
पाण्याखाली गेल्या आहेत. ३,३०० हून अधिक लोकांना तात्पुरत्या
सरकारी मदत केंद्रांमध्ये स्थलांतरित करावे लागले आहे. मुहारी यांनी सांगितले की, मंगळवारपर्यंत
५२ मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. बचाव कर्मचारी बेपत्ता झालेल्या
२० जणांचा शोध घेत आहेत.
नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट एजन्सीचे
प्रवक्ते अब्दुल मुहारी यांनी सांगितले की, पश्चिम सुमात्रा
प्रांतातील चार जिल्ह्यांतील अनेक गावे शनिवारी मध्यरात्री , पावसामुळे
निर्माण झालेल्या भूस्खलनामुळे आणि मारापी पर्वताच्या थंड लावा उतारावरून आलेल्या
चिखलामुळे पूर आला. या पुरात अनेक लोक वाहून गेले असून १०० हून अधिक घरे आणि
इमारती पाण्याखाली गेल्याचे त्यांनी सांगितले. थंड लावा हे ज्वालामुखीजन्य पदार्थ
आणि ढिगाऱ्यांचे मिश्रण आहे जे पावसाच्या वेळी ज्वालामुखीच्या उतारावरून खाली
वाहते.