घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाले असून सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.दरम्यान, एनडीआरएफचं बचावकार्य अखेर पूर्ण झाले असल्याची माहिती बीएमसी आय़ुक्त भूषण गगरानी यांनी दिली आहे. आता ढिगाऱ्याखाली कुणीही अडकले नसून फक्त होर्डिंगचे सामान आहे अशीही माहिती भूषण गगरानी यांनी दिली आहे .आज सकाळी गगरानी यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेत पाहणी केली.
या भीषण घटनेनंतर अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याचं काम कालपासून सुरू झाले आहे. होर्डिंग्ज लावण्याची जी मानांकन ठरवून दिली आहेत त्या व्यतिरिक्त जर होर्डिंग असतील तर ती हटवली जात आहेत. होर्डिंग्जच्या मानकांमध्ये त्या होर्डिंग ची साईज, त्याचं फाउंडेशन, त्याचा आकार, होर्डिंग च्या मधून पास होणारी हवेची हवा , स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी यांची मानके ठरवली असल्याचंही भूषण गगरानी म्हणाले आहेत.
पेट्रोल पंपला याबाबतचा प्रोविजनल परवाना दिला होता. पण त्याला पेट्रोल पंप चालवण्याचा परवाना आहे का हे आता तपासले जाते. जर त्याच्याकडे ते परवाना नसेल तर त्याच्यावर ही कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून सोमवारी मोठी दुर्घटना घडली होती घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे अनधिकृत जाहिरात होर्डिंग अचानक वादळानंतर कोसळले.या होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर होर्डिंगखाली अडकलेले 88 जण जखमी झाले आहेत. अनेक जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत .
घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी इगो मीडिया कंपनीचा संचालक भावेश प्रभूदास भिंडे हा फरार असून मुंबई पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भावेश भिंडे कुटूंबाला घेऊन फरार झाल्याची माहिती समोर आली आहे